शेतकरी आंदोलनाबाबत पवारांचा केंद्र सरकारला इशारा; तोडगा काढला नाही, तर…
राजकारण

शेतकरी आंदोलनाबाबत पवारांचा केंद्र सरकारला इशारा; तोडगा काढला नाही, तर…

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज ३४वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीत शेतकरी अजूनही दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. देश्भारतील अनेक शेतकरी संघटनांसह राजकीय पक्ष देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. मात्र आता नव्या कृषी कायद्यांवरुन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही मोदी सरकारला इशारा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पीटीआय वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. याआधी आज शरद पवार यांनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांची भेट घेतली. “राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज ३४ वा दिवस आहे. उद्या पुन्हा एकदा सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक होणार आहे. मात्र ३० डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत जर कोणताही तोडगा निघाला नाही. तर सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावून, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊ, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना तर केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये आजवर झालेल्या बैठकीतून काहीच तोडगा निघू शकलेला नाही. पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन आता आणखी तीव्र केलं आहे. तसेच, महाराष्ट्रातीलही काही शेतकरी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले आहेत. त्यापैकी काही शेतकरी आज पवारांना दिल्लीत भेटले. दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. शेतकऱ्यांनी ते स्विकारलं असून बुधवारी दुपारी २ वाजता केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक होणार आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.