चार मुलांचा बाप असणारा भाजपनेता मांडणार लोकसंख्या नियंत्रण विधेयक
राजकारण

चार मुलांचा बाप असणारा भाजपनेता मांडणार लोकसंख्या नियंत्रण विधेयक

नवी दिल्ली : संसदेच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनात भाजप खासदार रवी किशन लोकसंख्या नियंत्रण खासगी विधेयक मांडणार आहेत. विशेष म्हणजे हे विधेयक मांडणाऱ्या खासदार रवी किशन यांनाच चार मुलं आहेत. स्वत:ला चार मुलं असलेले भाजपचे गोरखपूरचे खासदार हे आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण २०२१-२०३० धोरण जाहीर केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशामध्ये लोकसंख्या नियंत्रण विधेयकासंदर्भातील चर्चांनी जोर धरला आहे. अशातच आता रवी किशन हे खासगी विधेयक मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र स्वत:ला तीन मुली आणि एक मुलगा असणारे रवी किशन हे खासगी विध्येयक मांडणार असल्याने सोशल नेटवर्किंगवर चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांनी हा विरोधाभास असल्याचं मत व्यक्त केलं आहे. २३ जुलै रोजी रवी किशन हे खासगी विधेयक संसदेमध्ये मांडणार आहेत.

यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही रवी किशन यांना टोला लगावला आहे. स्वतःला चार मुलं असलेले भाजपचे गोरखपूरचे खासदार रवी किशन लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार, असं म्हणत आव्हाड यांनी पुढे ज्येष्ठ विचारवंत एडवर्ड ल्यूस यांचं एक वाक्य शेअर केलं आहे. ज्येष्ठ विचारवंत एडवर्ड ल्यूस म्हणतो, गरिबी माणसाला जास्त मुलं जन्माला घालायला भाग पाडते. ती त्याच्या उतारवयाची गुंतवणूक असते, असं आव्हाड म्हणाले. याचसंदर्भात इतरही काही ट्विट लोकांनी केली आहेत.