राजकारण

अजित दादांचा पायगुणच वाईट, म्हणून आमची सत्ता गेली; भाजपनेत्याची खंत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पायगुण वाईट आहे. त्यांच्यामुळे आमची सत्ता गेली असल्याची खंत विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी बोलून दाखवली आहे. पहाटेच्या शपथविधीवरून त्यांनी असे म्हटले आहे. यावरून भाजपनेत्यांच्या मनात ती सल अजूनही असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडीत महाविकासआघाडीने बाजी मारली आहे. शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती पदी आल्या आणि आमचं सरकार आलं, म्हणून त्यांना पुन्हा या पदावर नियुक्त केले, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान सभेत सांगितलं. त्यावर बोलताना अजितदादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिलं. आमच्यासोबत अजितदादा आले सत्तेचं काय झालं? असा टोला दरेकर यांनी लगावला. अजित पवारांच्या पायगुणाचा उल्लेख करत असताना त्यांच्या पायगुणाने आमची सत्ता गेली ही खंत प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. मात्र विरोधकांच्या सभात्यागामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत