Pune Bypoll Election Results : कसब्यात रवींद्र धंगेकरचा दणदणीत विजय, भाजपाला धक्का
राजकारण

Pune Bypoll Election Results : कसब्यात रवींद्र धंगेकरचा दणदणीत विजय, भाजपाला धक्का

Pune Bypoll Election Results : कसबापेठ पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर तब्बल 10950 मतांनी विजयी झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मतं मिळाली आहेत. तर भाजपच्या हेममंत रासने यांना 62 हजार 244 मतांवर समाधान मानावं लागलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. पोस्टल व्होटिंगमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना आघाडी होती, ती त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. धंगेकर यांनी आता भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे कसबा पोटनिवडणुकीत भाजपने सर्वस्व पणाला लावले. मनसे, शिवसेना शिंदे गटाचाही भाजपला पाठिंबा आहे. मात्र, पुण्यातील जनतेने भाजपला धक्का देत रवींद्र धंगेकर यांना निवडून दिले. रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्याचे समजताच काँग्रेस समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.

या निवडणुकीत मनसेने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. जिथे आमदार मृत्यू पावला तिथे उमेदवार देणार नाही अशी राज ठाकरेंची भूमिका आहे. याशिवाय अंधेरी पोटनिवडणुकीप्रमाणे कसबा निवडणुकीसाठी बिनविरोध निवडणूक घेण्याचे आवाहन करणारे पत्र लिहिले होते. मात्र, महाविकास आघाडीने उमेदवार दिल्यानंतर मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला. पुण्यात मनसेची ताकद अजूनही चांगली आहे. मात्र, राज ठाकरेंच्या बदलाच्या निर्णयाचा फटका मनसेला बसला. मनसे सैनिकही भाजपच्या मदतीला धावून आले मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.