पुणे सर्वांनाच आपलंसं करुन घेतं; पण देवेंद्रजी…मी पुन्हा कोल्हापूरला जाणार
राजकारण

पुणे सर्वांनाच आपलंसं करुन घेतं; पण देवेंद्रजी…मी पुन्हा कोल्हापूरला जाणार

पुणे : ‘देवेंद्रजी…मी पुन्हा कोल्हापूरला जाणार. असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पुण्यात अटल संस्कृती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. कोल्हापूरला परत जाण्याच्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांनी अनेक चर्चांना वाव दिला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजप प्रदेशाध्यक्ष पदी असणाऱ्या पाटील यांच्या या वक्तव्यामुळं बऱ्याच राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”’पुणे, सर्वांनाच आपलंसं करुन घेतं. इथं प्रत्येकाला सेटल व्हावसं वाटतं…. पण मी जाणार. देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे. माझ्या विरोधकांनाही हे सांगा’, असंही  चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

पुण्यात प्रत्येकालाच सेटल व्हावंसं वाटतं. पण, देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे, असं म्हणत पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. कोल्हापूरच्या मतदार संघाकडे पाठ फिरवत पाटील यांनी पुण्यातील मतदार संघाची निवड करत सोपी खेळी खेळली अशा आशयाचे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. किंबहुना हे आरोप सातत्यानं सुरुच आहेत. परिणामी राजकीय कारकिर्दीतील पुढची निवडणूक ही कोल्हापुरातूनच लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.