राजकारण

बिहार विधानसभा : पंधरा वर्षे काय शेंगा सोलत होतात का ? राबडी देवींचा मोदींना खोचक सवाल

कोरोनाच्या संकटनानंतरही बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढत आहे. आता नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सोशल मीडियावर निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर सतत टीका करणारे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी रोजगार देण्याविषयी वक्तव्य केले होते. त्यावर लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी जोरदार टीका केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जर आम्हाला संधी मिळाली तर बेरोजगारी दूर करण्यासाठी जराही वेळ घालवणार नाही असं बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी प्रचार सभेत म्हटलं होते. सुशील मोदी यांच्या या वक्तव्यावर वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून आल्या. त्यांपैकी एक बातमी सुशील मोदी यांनी ट्विटरवर शेअर केली. मोदी यांचे तेच ट्विट रिट्विट करत राबडी देवी यांनी प्रश्न उपस्थित केला.

“लो कर लो बात. 15 वर्षांपासून काय वाटाण्याच्या शेंगा सोलत होतात काय?, बिहारमध्ये बेरोजगारी आहे हे नीतीश कुमार आणि सुशील मोदी यांना 15 वर्षांनंतर समजलं आहे. तेजस्वी तुम्हा लोकांना आता मुद्द्यांवर आधारित राजकारण शिकवेल” असं ट्विट राबडी देवी यांनी केलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डावे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत