बॉलिवूड यूपीला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही; ‘या’ केंद्रिय मंत्र्यांचा योगींना घरचा आहेर
राजकारण

बॉलिवूड यूपीला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही; ‘या’ केंद्रिय मंत्र्यांचा योगींना घरचा आहेर

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूडला नोएडाला नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर दिला आहे. इलेटक्ट्रिक रिक्षा आणि गुड्स करिअरच्या उद्धाटनासाठी ते मुंबईत आले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

योगी आदित्याथ आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. यावेळी ते मुंबईतील प्रतिष्ठित उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांशी चर्चा करुन उत्तर प्रदेशमध्ये आर्थिक गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीतर्फे योगींच्या या दौऱ्यावर टीका केली जात आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडून बॉलिवूड उत्तर प्रदेशमध्ये हलवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाविकास आघाडीतर्फे केला जातोय. या पार्श्वभूमीर प्रतिक्रिया विचारली असता, रामदास आठवले यांनी याोगी आदित्यनाथ यांचा बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असं म्हटलं आहे.

दरम्यान, आज (ता. 2) मुंबईत पत्रकार परिषद घेत आम्ही नवी फिल्मसिटी तयार करायला आलो आहोत, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच, बॉलिवूड मुंबईमंध्येच राहील याची ग्वाहीदेखील यावेळी त्यांनी दिली. बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवं मॉडल तयार करायचं आहे. वर्डक्लास फिल्मसिटी तयार करण्यासाठी फिल्मी दुनियेच्या लोकांशी मी चर्चा केली. आम्ही कुणाचं काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नवी निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे.