आठवले म्हणतात, महाविकास आघाडी सरकारला १००पैकी एवढे गुण
राजकारण

आठवले म्हणतात, महाविकास आघाडी सरकारला १००पैकी एवढे गुण

नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या कामगिरीबाबत केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी एक ट्विट केले आहे. रामदास आठवले ट्विटमध्ये म्हणतात, महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीला 100 पैकी किती गुण द्याल असा जनतेला प्रश्न विचारला तर जनता केवळ 30 गुण देऊन महाविकास आघाडी सरकारला नापास सरकार ठरविल, असे म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाविकास आघाडी सरकारला आज वर्ष पूर्ण झालं. या निमित्ताने विरोधक सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. अशात आता रामदास आठवले यांनीही टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारला ही जनताच १०० पैकी ३० गुण देऊन नापास करेल अशी टीका त्यांनी केली आहे.

महाविकास आघाडीचा एक वेगळा प्रयोग महाराष्ट्रात गेल्या वर्षी झाला. शरद पवार हे या महाविकास आघाडीचे खरे शिल्पकार आहेत आणि काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत आणण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. खरंतर भाजपा आणि शिवसेना यांनी युती म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यावरुन या दोन्ही पक्षांचं फाटलं. त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात झाला.