रावसाहेब दानवे यांचे कर्तृत्व शून्य, मोठ्या माणसाचा पदर धरून पुढे आलेले गावगुंड; हर्षवर्धन जाधव
राजकारण

रावसाहेब दानवे यांचे कर्तृत्व शून्य, मोठ्या माणसाचा पदर धरून पुढे आलेले गावगुंड; हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : ”रावसाहेब दानवे यांचे कर्तृत्व शून्य आहे. मागे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे तर आता नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादावर ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे मोठे होतात तसेच ते पुढे आले आहेत,” अशी घणाघाती टीका माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केली आहे. तसेच, सत्ता कधीच जाणार नाही या अविर्भावात त्यांचे वर्तन असते. असेही त्यांनी म्हंटले आहे. हर्षवर्धन जाधव यांनी आज प्रहारच्या जलकुंभावरील ठिय्या आंदोलनस्थळी भेट दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून यात चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही” केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं होतं. या विधानावरून राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत आहेत. शेतकरी विरोधातील विधानावर माफी मागावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवाजी नगर येथील जलकुंभावर गुरुवारपासून आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी दुपारी आंदोलनस्थळी रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भेट दिली

यावेळी त्यांनी दानवे यांच्यावर जोरदार टीका केली. जाधव म्हणाले, जाधव म्हणाले, केंद्रीय मंत्री असलेल्या जबाबदार व्यक्तीकडून असे वक्तव्य होणे चुकीचे आहे. आंदोलन सुरु असताना कुठल्याही केंद्रीय मंत्र्यांनी नेमकी अडचण काय आहे हे जाणून घेऊन सरकार आणि आंदोलकांमधील दुआ म्हणून काम करावे. मात्र, हे सोडून शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीनचे हस्तक संबोधणे म्हणजे गावगुंडांप्रमाणे केलेले अक्कल शून्य व्यक्तव्य आहे. देशाला ज्यांनी सावरले त्या शेतकऱ्यांची दानवे यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणीही जाधव यांनी केली.