काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा
राजकारण

काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा

चंदीगढ : पंबाजमध्ये काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत. आज सकाळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ पंजाबमध्ये दिवसभरातला काँग्रेसला हा दुसरा धक्का असून महिला कॅबिनेट मंत्री रजिया सुलताना यांनी राजीनामा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही दिवसांपूर्वी १८ सप्टेंबर रोजी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चरणजीतसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं. आज सकाळी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर आता दोनच दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या महिला मंत्री रजिया सुलताना यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पंजाबमध्ये नेमकं घडतंय काय? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.