पूजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघांना संजय राऊतांकडून प्रत्युत्तर; म्हणाले..
राजकारण

पूजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघांना संजय राऊतांकडून प्रत्युत्तर; म्हणाले..

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपा आता अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. अशातच चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ल असतं असं वक्तव्य केलं आहे. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी नुकताच एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

”चित्रा वाघ या विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे त्या आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणाची अतिरिक्त माहिती असेल तर त्यांनी ती राज्याचे गृहमंत्री आणि तपास यंत्रणाना द्यावी, असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर “या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर त्यांनी अशा पत्रकार परिषदा घ्याव्यात. या अशा प्रकरणांचा प्रसिद्धीसाठी कोणीही वापर करु नये.” असा सल्लाही चित्र वाघांना दिला आहे.

तसेच, ” राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत, ते ‘मिस्टर सत्यवादी’ आहेत. त्यामुळे पूजा चव्हाणला न्याय मिळणारच. पूजा चव्हाण प्रकरणी तपास सुरु आहे. मुख्यमंत्री हे अत्यंत संवेदनशील मनाचे आहेत. ते काही डोळे झाकून बसले नाहीत. मुख्यमंत्री हे कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत. त्यांचे राज्यातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असते. या प्रकरणाचा तपास होणार आणि पूजा चव्हाण आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळणार.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या वतीनं राज्यभर आंदोलन छेडलं आहे. असं विचारलं असता ते म्हणाले की, “आंदोलन करु नये अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. महाराष्ट्राची परंपरा ही सत्यासाठी, न्यायासाठी लढणारी अशी आहे. त्यामुळे हा प्रश्न चर्चेतून सोडवावा. या प्रकरणी विरोधी पक्षांनी विधानसभेत प्रश्न विचारावेत. असंही त्यांनी म्हंटल आहे.