महाराष्ट्रात कोरोना संकटातही मंत्र्यांची दालनांवर ९० कोटीं खर्च; कोणत्या बंगल्यावर किती खर्च
राजकारण

महाराष्ट्रात कोरोना संकटातही मंत्र्यांची दालनांवर ९० कोटीं खर्च; कोणत्या बंगल्यावर किती खर्च

मुंबई : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करावे लागले होते. त्यामुळे संपूर्ण राज्य आर्थिक संकटात सापडेले असताना दुरुस्तीच्या नावाखाली मंत्र्यांचे बंगले चकाचक करण्याचे काम राज्यात केले जात आहे. या साठी तब्बल ९० कोटींचा खर्च केला जातोय अशी माहिती समोर येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बंगल्याचे काम सुरु असताना महागड्या वस्तू वापराव्या असा दबाव मंत्री आणि त्यांचे पीए, पीएस आणतात असे दिसून आलं आहे. यावरुन विरोधी पक्ष भाजपने सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना काळात राज्यावर आर्थिक ताण असताना जनतेच्या कराच्या पैशांतून अशाप्रकारची हौस पूर्ण करणं योग्य आहे का? असा प्रश्न आता केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजिक पवार यांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले असून असा कुठल्याही प्रकारचा एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च झाला नसल्याचे सांगितले आहे.

अशाप्रकारच्या खर्चांमध्ये ताळमेळ असावा. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर असे खर्च दुर्लक्षित होतात. हा अनावश्यक खर्च आहे. हा खर्च होऊ नये यासाठी भाजप भूमिका घेईल. हा खर्च जनतेच्या पैशातून होतोय. कोणाच्यातरी सांगण्यावरुन खर्च होतोय असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

कोणाच्या बंगल्यावर किती खर्च
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला – ३ कोटी २६ लाख
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगिरी बंगला -१ कोटी ७८ लाख
धनंजय मुंडे यांचा चित्रकूट बंगला – ३ कोटी ८९ लाख
एकनाथ शिंदे यांच्याकडील बंगल्यावरील खर्च – २ कोटी ८० लाख
बाळासाहेब थोरात यांचा रॉयलस्टोन बंगला – २ कोटी २६ लाख
छगन भुजबळ यांचा रामटेक बंगला – १ कोटी ६७ लाख
अशोक चव्हाण यांचा मेघदूत बंगला – १ कोटी ४६ लाख
सुभाष देसाई यांचा शिवनेरी बंगला – १ कोटी ४४ लाख
अमित देशमुख यांचा बी ३ बंगला – १ कोटी ४० लाख
आदित्य ठाकरे यांचा सातपुडा बंगला – १ कोटी ३३ लाख
नितीन राऊत यांचा पर्णकुटी बंगला – १ कोटी २२ लाख