चंद्रपूर दारूबंदी : सचिन सावंतांनी केली पोलखोल; फडणवीसांचा तो व्हिडिओ व्हायरल
राजकारण

चंद्रपूर दारूबंदी : सचिन सावंतांनी केली पोलखोल; फडणवीसांचा तो व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूर : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, अवैध दारूविक्री व वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने, राजकीय वातावरण तापलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. अनेक ग्रामपंचायती, महिला संघटना, बचतगट आदींनी दारूबंदीसाठी ठराव केले होते. मात्र आता दारूबंदी उठवण्यात आल्याने भाजप नेते आक्रमक झाले असून, सरकारवर जोरदार टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी, चंद्रपुरमधील दारू बंदी संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते, हे दाखवणारा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. तो व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यानुसार मालपाणीचे पुरस्कर्ते असलेल्या सुधीर मुनगंटीवार व महाराष्ट्र भाजप यांच्या प्रबोधनाकरिता देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक सुयोग्य कोण असेल बरं? भाजपाचा दुटप्पीपणा उघड करताना ऐका बरं फडणवीस काय म्हणतात ते! असं सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे.

सुधीरभाऊ तुम्ही खूप चांगल्या मानसिकतेतून चंद्रपुरमध्ये दारूबंदी केली. पण आता तुम्हाला देखील पश्चाताप होत असेल, की मी हे का केलं? कारण हे मालपाण्याचे पुरस्कर्ते आहेत, सगळ्यांना मालपाणी मिळत आहे. असं फडणवीस या व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहेत. तर आता राज्य सरकारने चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.