सचिन वाझेचा ईडीच्या जबाबात मोठा खुलासा; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ?
राजकारण

सचिन वाझेचा ईडीच्या जबाबात मोठा खुलासा; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ?

मुंबई : सचिन वाझेने आपल्या जबाबात मोठा खुलासा केला असून त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सचिन वाझे याने कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेचं नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या सुत्रांनी ही माहिती दिल्याचे वृत्त न्यूज १८लोकमतने दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

4 कोटी 80 लाख रुपये बार मालकांनी सचिन वाझेला दिले. सचिन वाझेने हेच पैसे कुंदन शिंदेला दिले. आणि कुंदन शिंदेने हे पैसे अनिल देशमुख यांना दिले असा खुलासा सचिन वाझेनं त्याच्या जबाबात केला असल्याचं सांगितले आहे. दुसरीकडे कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या रिमांड सुनावणीला मुंबई सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे. न्यायमूर्ती डॉ. यू. जे मोरे यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरु आहे. वकील शेखर जगताप संजीव पालांडे यांची बाजू मांडत तर कुंदन शिंदे यांची बाजू वकील अभिजीत सावंत आणि मेहूल ठक्कर मांडताहेत. ईडीच्या बाजून वकील सुनिल गोंसावलीस बाजू मांडत असून त्यांनी दोघांची 7 दिवसांची ईडी कोठडीची मागणी केली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात तीन जनहित याचिका दाखल दाखल केल्या असून या याचिकेवर दिलेल्या आदेशावर सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ईडीचे वकील सुनिल गोंसावलीस यांनी दिली आहे.

कोण आहेत कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे?
संजीव पालांडे हा अनिल देशमुख यांचा स्वीय सहाय्यक आहेत तर कुंदन पालांडे हा अनिल देशमुख यांचा असिस्टंट आहे. बार मालकांकडून पैसे काढायचे असा आरोप यांच्यावर आहे, अशी माहिती वकिलांनी दिली आहे. सचिन वाझेने डिसेंबर महिन्यात 40 लाख रुपये गुडलक म्हणून संजीव पालांडेला दिले होते. मुंबई पोलीस परिमंडळ 1 ते 6 आणि 7 ते 12 या 12 भागांतून मिळून सचिन वाझेनं 4 कोटी 80 लाख रुपये गोळा केले होते. 60 बार मालकांकडून पैसे वसूल केले, असा दावा वकिलांनी न्यायालयात केला आहे. कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना PMLA ACTअंतर्गत यांना अटक केली आहे. यांची अजून चौकशी करणे बाकी आहे. पैशांचे मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले आहेत. या प्रकरणी आणखी लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे या बाबत चौकशी करायची असल्याचं सुनिला गोंसावलीस यांनी न्यायालयात म्हटलं आहे.