भिडे गुरुजी आणि एकनाथ शिंदेंची बंद खोलीत तासभर चर्चा; चर्चांना उधाण
राजकारण

भिडे गुरुजी आणि एकनाथ शिंदेंची बंद खोलीत तासभर चर्चा; चर्चांना उधाण

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी आज शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दरे (ता.महाबळेश्वर) गावी जाऊन भेट घेतली. काल खासदार उदयनराजेंनी बोटीतून जाऊन मंत्री शिंदे यांची भेट घेतली होती, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजींनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याविषयी भिडे गुरुजी यांना विचारले असता त्यांनी भेटीचे कारण सांगण्याचे टाळले. सुमारे तासभर दोघांत बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेत नेमके काय मुद्दे होते, याची उत्सुकता आता ताणली आहे. मात्र, मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सदिच्छा भेट होती, असे स्पष्ट केले आहे. बंद खोलीतील चर्चेनंतर मंत्री शिंदे यांच्या शेतात संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते फणसाचे रोप लावण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

दरम्यान, खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षण व सातारा शहरातील पालिकेच्या विविध विकासकामांसंदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजी यांनी भेट घेतल्याने या दोन्ही भेटीतून काय घडणार का, याची चर्चा सुरु झाली आहे.