राजकारण

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर FIR दाखल, ‘असं’ आहे प्रकरण

नवी दिल्ली : शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात ( sanjay raut booked ) भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज यांनी ९ डिसेंबरला संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावरून राऊत यांच्यावर १२ डिसेंबरला एफआयआर नोंदवण्यात आला आहे. संजय राऊत यांची एक मुलाखत ९ डिसेंबरला प्रसारित झाली होती. या मुलाखतीत राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी अपशब्द वापरले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दीप्ती रावत भारद्वाज यांनी मंडावली पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. आता याप्रकरणी कलम ५०० आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर महिलांचा अवमान केल्याप्रकरणी तसेच महिलांसाठी समाजिकरित्या अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांसाठी अपशब्द वापरले

संजय राऊत यांनी केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांसाठीच नव्हे, तर कार्यकर्त्यांमध्ये सहभागी असलेल्या महिलांबाबतही चुकीचे शब्द वापरले आहेत, या आधारावरही असाही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राऊत यांच्या सारख्या घटनात्मक पदावर विराजमान झालेले नेते ज्यांची समाजाबद्दल जबाबदारी सामान्यांपेक्षा अधिक आहे. अशा बेजबाबदार आणि असभ्य व्यक्तीपासून संपूर्ण देशातील महिला आणि भाजप महिला मोर्चा त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

ट्विटरवर माफी मागितल्याची चर्चा होती

संजय राऊत यांच्या माफी मागून आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी दीप्ती रावत भारद्वाज यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवरून केली होती. आतापर्यंत राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी कुठलीही माफी मागितलेली नाही. पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. दीप्ती रावत भारद्वाज यांनी तक्रार नोंदवताना अपशब्द वापरल्याच्या टिव्ही चॅनलच्या क्लिपिंग्जही पोलिसांना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.