कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा नाही तर धमकी देतोय – संजय राऊत
राजकारण

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा नाही तर धमकी देतोय – संजय राऊत

कर्नाटकचे मुख्यमंत्र बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील गावांवरून केलेल्या विधानांमुळे आणि ट्वीटमुळे हा प्रश्न अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. सांगलीतील जत तालुक्यासह सोलापूरमधील काही गावांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे राज्यात संतापाचं वातावरण पसरलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यानेच महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगितल्याने ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार संजय राऊत यांनी तर थेट बोम्मई यांना इशारा दिला आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा नाही, तर धमकी देतो. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

बोम्मई यांच्या या ट्वीटचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. यावर संतप्त प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला.

40 आमदारांचा गट आहे ना. स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी शिवसेनेतून बाहेर पडत आहोत, असं त्यांनी सांगितलं होतं ना. आता कुठे आहे तुमचा स्वाभिमान? कुठं शेण खातोय तुमचा स्वाभिमान? कुठं पेंड खातोय तुमचा स्वाभिमान? एक मुख्यमंत्री गाव घेत आहे. एक उद्योग घेतो आहे अन् षंडासारखे बसला आहात तुम्ही? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

१०६ हुतात्मे झाले आहेत. आम्ही आणखीन हुतात्मे देऊ. रक्त सांडू. आम्हाला तुरुंगाची भीती नाही. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, ज्यानं ६९ हुतात्मे दिले आहेत. बाळासाहेबांनी तुरुंगवास भोगलाय, आम्हीही भोगू. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मी शिवसेनेकडून इशारा नाही देत, धमकी देतोय समजा. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा. ‘हे घेऊ, ते घेऊ’ ही तुमची बकबक बंद करा. आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. अशा शब्दांत राऊतांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.