काय सांगता ! संजय राऊत देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेणार; पण केव्हा?
राजकारण

काय सांगता ! संजय राऊत देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेणार; पण केव्हा?

पुणे : दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची लवकरच मुलाखत घेणार आहेत. मात्र ही मुलाखत केव्हा होणार हे मात्र सांगायला त्यांनी नकार दिला. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपला चांगला संवाद आहेच, त्यामुळे मी त्यांची मुलाखत घेणारच. त्यामुळे मुलाखत होणार आहे पण पेपर न होता रिझल्ट बघायला मिळेल असं राऊत म्हणाले. तसेच, धोरणांवर टीका म्हणजे मोदींवर टीका नाही, असेही ते म्हणाले आहेत. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, विरोधकांनी धार्मिक राजकारण करत मंदिरे उघडायला लावली आता कोरुना रुग्णांची संख्या वाढत आहे. मंदिरे उघडावी लागली परंतु आता जे रूग्ण वाढवत आहेत वाढत आहेत त्याचे उत्तर ते देणार आहेत का? असा सवालही त्यांनी विचारला. याबरोबरच मुख्यमंत्री दूरदृष्टीचे नेते त्यांना कल्पना होती म्हणून त्यांनी हळूहळू येथे गोष्ट सुरू करण्याची भूमिका घेतली, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांना सेलिब्रिटींच्या ट्विट संदर्भात विचारले असता, ते म्हणाले की, पूर्वीच्या सेलिब्रिटींचा चळवळींशी संबंध होता आणि आणि त्याचं राष्ट्रीय भान होते. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांचा प्रभाव असून अजित पवार मास्तरांच्या भूमिकेत आहेत आणि कोरोना स्थिती चांगली हाताळत आहेत, असेही वक्तव्य राऊत यांनी केले.

तसेच, राज्यातील २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुक ऐतिहासिक ठरली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आघाडी सरकारची स्थपना केली. आता राज्यात आगामी महापालिका निवडणुकाचे वेध सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा विरोधात महाविकास आघाडी कशा पद्धतीने या निवडणुका लढेल, यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

”आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढायची हे सूत्र ठरलं आहे. पुणे, पिंपरी- चिंचवड अशा काही महापालिका आहेत, जिथे राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे. तिथे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुका एकत्र कशा लढायच्या, या बद्दल अजित पवारांबरोबर चर्चा करु. तसेच, एकत्र निवडणुकूच लढलो तर निश्चित सत्ता परिवर्तनाच्या दिशेने सुरुवात होईल असे संजय राऊत यांनी सांगितले.