तुम्ही माझा वेळ घालवत आहात म्हणत शरद पवारांना संताप अनावर; पत्रकार परिषद मध्येच सोडून निघून गेले
राजकारण

तुम्ही माझा वेळ घालवत आहात म्हणत शरद पवारांना संताप अनावर; पत्रकार परिषद मध्येच सोडून निघून गेले

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात यावेळी चर्चा झाली. दरम्यान सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पुन्हा एकदा व्हायरल झालं आहे. राजनाथ सिंह यांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी सवड साधला. यावेळी त्यांना पत्राबद्दल विचारण्यात आलं असता यावर भाष्य केलं.”ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे त्यांनी ते थोडं नीट वाचलं असतं तर त्यांचा वेळ वाचला असता,” असा टोला त्यांनी लगावला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “कायद्यातील सुधारणांसंदर्भात पत्र लिहिलं होतं यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण आज जे तीन नवे कृषी विधेयक आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नाही. विषय भरकटवण्यासाठी हे केलं जातय. याला जास्त महत्व देऊ नका. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं सांगत अधिक बोलण टाळलं. मात्र पत्रकारांनी वारंवार पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारल्याने शरद पवार संतापले.

याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, “शेतीच्या मुद्यावर मी बोलणार नाही. जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत मी यावर मत प्रदर्शन करणार नाही. उद्या आम्ही वेगवेगळ्या पक्षातील लोक एकत्र बसून चर्चा करणार आहोत आणि एकमताने निर्णय घेणार आहोत. त्यामुळे एकट्याने भूमिका मांडणं योग्य नाही. आम्ही उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत. त्यांच्यासमोर आमची एकत्रित भूमिका मांडू.

मात्र पत्रकारांनी पुन्हा एकदा त्यांना शेतकरी आंदोलन आणि २०१० मधील पत्रासंबंधी विचारलं. यावर त्यांनी मी एकदा उत्तर दिलं आहे. माझं पत्र नीट वाचा एवढंच म्हणत आहे असं उत्तर दिलं. पण यानंतर जेव्हा पत्रकारांनी पुन्हा त्याच विषयावर प्रश्न विचारले तेव्हा मात्र शरद पवार संतापले. “तुम्ही माझा वेळ घालवत आहात. मी शेतीच्या मुद्यावर बोलणार नाही सांगितलं असतानाही तुम्ही वारंवार तोच प्रश्न विचारत आहात. तुम्ही बाहेर उभे होता हे मला योग्य वाटलं नाही म्हणून बोलावलं. माझी चूक झाली यानंतर पुन्हा करणार नाही,” असं सांगत शरद पवार पत्रकार परिषद सोडून निघून गेले.”