शहाजीबापू पाटलांचा Swag च वेगळा; ‘काय झाडी, काय डोंगार…’, आसामच्या मुख्यमंत्र्यांना म्हणायला लावला डायलॉग!
राजकारण

शहाजीबापू पाटलांचा Swag च वेगळा; ‘काय झाडी, काय डोंगार…’, आसामच्या मुख्यमंत्र्यांना म्हणायला लावला डायलॉग!

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा ‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल…सगळं एकदम ओक्के’ हा डायलॉग चांगलाच गाजला होता. डायलॉग एवढा गाजला की, अनेकांच्या फोनच्या रिंगटोनला देखील सेट झाला. तर यावर अनेकांनी रिमिक्स गाणी देखील तयार केली. अनेक मिम्स देखील तयार करण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत उभी फूट पडली. राज्यातील राजकीय समीकरण बदललं अन् राज्याला भाजप शिंदे गटाचं नवं सरकार मिळालं. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार आणि खासदार सहकुटुंब गुवाहटीला गेले आहेत. त्यावेळी शहाजीबापू पाटलांचा स्वॉग पहायला मिळाला.

शिंदे गटाचे सदस्य गुवाहटीला गेले असताना सर्वांनी शहाजीबापूंना डायलॉग म्हणण्याचा आग्रह केला. शहाजी बापूंना काय झाडी, काय डोंगार हा डायलॅाग बोलायला लावला. त्यावेळी विनंतीला मान देत शहाजी बापूंनी डायलॉग आहे तसा म्हणून दाखवला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा देखील उपस्थित होते. हेमंत बिस्वा शर्मा यांना देखील मोह आवरेना. त्यांनी पाटलांना डायलॉग म्हण्याची विनंती केली. शहाजी बापू पाटलांनी हा डायलॉग इंग्रजीत देखील बोलून दाखवला.