ममतांना मिळणार शिवसेनेची साथ! विधानसभेच्या तोंडावर मोठा निर्णय
राजकारण

ममतांना मिळणार शिवसेनेची साथ! विधानसभेच्या तोंडावर मोठा निर्णय

मुंबई : पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात महाराष्ट्रात सत्तेत असलेली शिवसेना उतरणार असून राज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला साथ देणार असल्याचे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेनं तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उत्तर प्रदेश आणि बिहार बरोबरच शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू होती. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वर्तुळाचं शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार की नाही? हे जाणून घेण्याबद्दल असंख्य लोकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर याठिकाणी माहिती देत आहे. पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती बघितली तर असं दिसतंय की, दीदी विरुद्ध सर्व अशीच लढाई दिसत आहे. सर्व एम म्हणजे मनी, मसल आणि मीडिया यांना ममता दीदीविरुद्ध वापरलं जात आहे. त्यामुळे असा निर्णय घेतला आहे की, शिवसेना पश्चिम बंगालची निवडणूक लढणार नाही आणि ममतांना समर्थन असेल. आम्हाला आशा आहे की, ममता दीदींची डरकाळी पुन्हा एकदा यशस्वी होईल. कारण त्या खऱ्या बंगाली टायगर आहेत, यावर आमचा विश्वास आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.