पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या बालेकिल्याला शिवसेनेचा सुरुंग
राजकारण

पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या बालेकिल्याला शिवसेनेचा सुरुंग

पुणे : पुण्यापासून अवघ्या 15 कि.मी अंतरावर असणाऱ्या भोर तालुक्यातील कुसगावमध्ये गेली 40 वर्षे काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र काँग्रेसने गावात विकासकामे न केल्याने मतदारांनी त्यांना या ग्रामपंचायत निवडणुकीत कात्रजचा घाट दाखवत शिवसेनेला एकहाती सत्ता दिली. कुसगाववासीयांनी एकमताने शिवसेनेच्या श्री काळभैरवनाथ गाव विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व 9 उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या निवडणुकीत श्री काळभैरवनाथ गाव विकास पॅनलच्या ज्ञानेश्वर शंकर मांढरे, सुरेखा दीपक तांबट, रंजना दत्तात्रय गोरे, मयूर हरिभाऊ मांजरे, प्रतिक प्रभाकर गायकवाड, सविता संजय गायकवाड, पुष्पा रामचंद्र मांढरे, छाया शांताराम पांगारे, आनंदीबाई गोरख लांघे यांनी विजय मिळविला आहे. श्री काळभैरवनाथ गाव विकास पॅनलच्या सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी गावात येणारा मुख्य रस्ता, गावातील अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेजलाईन, आरोग्य व शैक्षणिक सुविधा या गोष्टीच्या विकासाला प्राधान्यक्रम देऊन कुसगावला प्रगतिपथावर नेण्याचे ठरविले आहे.

श्री काळभैरवनाथ गाव विकास पॅनलच्या विजयासाठी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख कुलदीप तात्या कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड. निखिल संजय कोंडे, संतोष शिंदे, दिलीप आबा तांबट, हनुमंत गेनबा मांढरे,(मा.उपसरपंच), संभाजी कोंडे, शंकर दत्तात्रय मांढरे, शोभाबाई शंकर मांढरे, समिंदराबई शंकर मांढरे, संतोष कोंडे, नंदकुमार रामचंद्र भालघरे आदींना सहकार्य केले.