तर शिवसेना औरंगजेबाची जयंतीही साजरी करायला मागेपुढे पाहणार नाही; भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल
राजकारण

तर शिवसेना औरंगजेबाची जयंतीही साजरी करायला मागेपुढे पाहणार नाही; भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई : ”ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना हिंदुत्वासाठी लढायला शिकवले, त्या शिवसेनेने असंख्य हिंदू बांधवांचे सक्तीने धर्मांतर करणाऱ्या क्रूरकर्मा टिपू सुलतानाची जयंती साजरी करावी? सत्ता टिकविण्यासाठी या थराला गेलेली शिवसेना औरंगजेबाची जयंतीही साजरी करायला मागेपुढे पाहणार नाही, अशा शब्दांमध्ये भाजपा प्रदेशचे उत्तर भारतीय मोर्चेचे अध्यक्ष संजय पांडे यांनी शिवसेनेवर टीका केली. पांडे यांनी आपली भूमिका जाहीर करणारं एक पत्रकच जारी केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काय लिहिले आहे संजय पांडे यांनी पत्रकात
शिवसेना टिपू सुलतानची जयंती साजरी करणार असल्याचे वृत्त ऐकून मोठा धक्का बसला, असं म्हणत संजय यांनी शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी असा टोला लगावला आहे. यामध्ये त्यांनी, टिपू सुलतानाचा इतिहास शिवसेनेला माहीत नसेल असे म्हणता येणार नाही. तरीही शिवसेना टिपूची जयंती साजरी करायला निघाली आहे.

ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना हिंदुत्वासाठी लढणे शिकवले, त्याच शिवसेनेने टिपू सुलतानची जयंती साजरी करावी यासारखी दुःखदायक गोष्ट नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी प्रसंगी सत्ताही लाथाडली त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला सत्तेसाठी कोणत्या थराला जावे लागते आहे हेच यातून दिसतं आहे, असं म्हटलं आहे. शिवसेनेने एवढ्यावरच थांबू नये, आता शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी, असा खोचक टोलाही पांडे यांनी लगावला आहे.