‘या’ अधिकाऱ्याच्या बदलीवरून तापले राजकारण; आढळरावांचा राज्य सरकारला घरचा आहेर
राजकारण

‘या’ अधिकाऱ्याच्या बदलीवरून तापले राजकारण; आढळरावांचा राज्य सरकारला घरचा आहेर

पुणे : राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून कोरोनावर उपचार म्हणून लागत असलेल्या रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अशात अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची राज्य सरकारने केलेल्या बदलीवरून आता चांगलेच राजकारण तापले असून शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यातील रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या टंचाईचे खापर अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यावर फोडण्यात येऊन त्यांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली अतिशय चुकीची व निषेधार्थ असल्याची टीका आढळराव पाटील यांनी केली आहे. अशा आशयाचे ट्वीट आढळराव पाटील यांनी केले आहे.

अभिमन्यू काळे यांना मी अतिशय जवळून ओळखतो. राजकीय हितापेक्षा लोकहीत नजरेसमोर ठेऊन त्यांनी नेहमीच आपल्या पदाला योग्य न्याय दिला आहे. त्यामुळेच त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून बदलीला सामोरे जावे लागले असून हे बाब अतिशय दुर्दैवी आहे. मराठमोळ्या शेतकरी कुटुंबातील एक प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या केलेल्या तकडफडकी बदलीला माझा ठाम विरोध असून जनसेवेसाठी अखंड काम करणाऱ्या या कार्यकुशल अधिकाऱ्यास माझा जाहीर पाठिंबा आहे, असेही आढळराव यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.