संजय राऊत यांची मोठी घोषणा; शिवसेना या राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार
राजकारण

संजय राऊत यांची मोठी घोषणा; शिवसेना या राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई : शिवेसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात शिवसेना उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन त्यांनी ही माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात येत आहोत, असा संदेशही राऊत यांनी ट्विटरद्वारे दिला आहे. तसेच शेवटी बंगाली भाषेत जय हिंद अशी घोषणाही त्यांनी केली. त्यांनी इंग्रजीमध्ये ट्विट करत ही माहिती सर्वांना दिली आहे.