राजकारण

सिद्धिविनायक मंदिर बंद पण शिवसेना खासदारांना मागच्या दाराने प्रवेश

मुंबई : कोरोनामुळे राज्यभरात मंदिरे बंद आहेत. राज्य हळूहळू अनलॉक करत असताना देखील मंदिरांना लागलेली कुलुपं मात्र उघडली गेली नाहीत. सर्वसामान्यांसाठी राज्यातील मंदिरं बंद असताना प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मात्र व्हीआयपी लोकांना बाप्पाचं दर्शन दिलं जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, निर्माती-दिग्दर्शक एकता कपूर यासारख्या व्हिआयपी लोकांना दर्शन देण्यात आल्याचे पुरावे नोंद वही आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. या संदर्भातील सिद्धिविनायक मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज आणि काही पुरावे बाहेर आल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.