बोला राष्ट्रवादी पुन्हा; भाजपा आमदाराने घेतली अजित पवारांची भेट
राजकारण

बोला राष्ट्रवादी पुन्हा; भाजपा आमदाराने घेतली अजित पवारांची भेट

मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका ऐन रंगात आलेल्या असताना अनेक विश्वासू आणि जवळच्या नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडत शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काहींना यश तर काहींना अपयश आले. मात्र आता पुन्हा एकदा ‘राष्ट्रवादी पुन्हा’ म्हणत अनेक नेत्यांची घरवापसी सुरू झालेली आहे. अशातच भाजपा नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र, ”नवी मुंबई शहरातील काही भूखंड अजूनही नवी मुंबई महापालिकेला मिळालेले नाहीत. ते मिळावेत म्हणून आज भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीविषयी नाईक यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. “नवी मुंबई शहरात असे अनेक भूखंड आहेत; जे अजूनही महानगरपालिकेला मिळालेले नाहीयेत. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मी भेट घेतली. लवकरात लवकर हे भूखंड नवी मुंबई महापालिकेला मिळावेत अशी मागणी मी त्यांच्याकडे केली. कारण हे भूखंड लोकांसाठी आहेत. लोकांसाठी घरांच्या गरजेचा विषय महत्वाचा आहे. सध्या कुटुंब वाढल्यामुळे अनेकांना घरांचा विस्तार करावा लागला आहे. त्यामुळे हे भूखंड नवी मुंबई महापालिकेला मिळणे गरजेचे आहे. हीच मागणी गेऊन मी अजित पवार यांना भेटायला गेलो,” असे गणेश नाईक म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी “भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे”, असा दावा केला होता. यावेळी गणेश नाईक भाजप सोडण्याची चर्चा झाली होती. त्यावेळी या चर्चेविषयी बोलताना नाईक यांनी पक्षबदलाचे सर्व आरोप फेटाळून लावत या सर्व बातम्या कपोलकल्पित असल्याचे म्हटले होते. पक्ष प्रवेशाच्या खोट्या बातम्या पेरुन विरोधकांचे मनसुबे पूर्ण होणार नसल्याचं त्यावेळी नाईक यांनी म्हटलं होतं.