राजकारण

भाजप खासदाराचा थेट अध्यक्ष जे पी नड्डांना अल्टीमेटम

नवी दिल्ली : भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आता थेट पक्षाला आणि पक्षाच्या अध्यक्षांनाचा अल्टीमेटम दिला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाकडे एक प्रस्ताव दिला असून, त्यावर कारवाई करण्यासाठी उद्यापर्यंतची वेळ दिली आहे. स्वामी मागील काही दिवसांपासून भाजपच्या आयटी सेलविरोधात आक्रमक झाले आहेत. त्या संदर्भातच त्यांनी हा अल्टीमेटम दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना मालवीय यांना हटवण्यासाठी एक प्रस्ताव दिला आहे. जर उद्यापर्यंत अमित मालवीय यांना आयटी सेलमधून हटवण्यात आलं नाही. तर त्याचा अर्थ असा होईल की, पक्ष माझा बचाव करू इच्छित नाही. पक्षात असा कोणताही मंच नाही, जिथे मी मत विचारू शकेल, त्यामुळे मला स्वतःलाच माझा बचाव करावा लागेल, अशा आशयाचे ट्विट करत स्वामी यांनी हा अल्टीमेटम दिला आहे.

प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. आपल्याला बनावट आयडीवरून ट्रोल केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर स्वामी यांनी आज पुन्हा एक ट्विट केलं आहे, ज्यात मालवीय यांच्यावरील कारवाईसाठी भाजपला अल्टीमेटम दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत