अनिल देशमुखांना मोठा झटका; सर्वोच्च न्यायलायकडूनही मिळाला नाही दिलासा
राजकारण

अनिल देशमुखांना मोठा झटका; सर्वोच्च न्यायलायकडूनही मिळाला नाही दिलासा

नवी दिल्ली : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयचा एफआयआर रद्द करण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने अटकेची टांगती तलवार अनिल देशमुखांवर कायम आहे. अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीनं ५ वेळा समन्स बजावले आहे. पाचवं समन्स मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी बजावलं होतं.

आज (ता. १८) त्यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, आज देखील अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर झालेले नाहीत.