‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही’
राजकारण

‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही’

शेवटी पुण्यातच लस तयार होत आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे नाहीतर कोणीतरी म्हणायचं मीच (स्वतः) लस शोधली. ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही’ असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, एक लक्षात ठेवा पुण्यातच करोनावरची लस तयार झाली आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. कुणी बाहेरुन क्लेम केला तर गैरसमज करु नये असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. आता आज मी इथे सुनीलभाऊंच्या घरी आले आहे. पण इथला स्वयंपाक मी केलेला नाही. तसंच लस ही पुणेकरांनी आणली आहे हे लक्षात असू द्या.. इतर कुणी क्लेम केल्यास तुम्हाला सांगता येईल असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटचा दौरा केला. या दौऱ्यावर सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. दिल्लीत तर एक लाख कोटींच्या पुढेच सगळ्या गप्पा असतात. आम्ही त्या गप्पा ऐकतो.. हे कोण बोलतं ते तुम्हाला माहित आहे. ते आज पुण्यात आलेत. दुनिया घुम लो पुण्याच्या पुढे काही नाही. जगभर फिरलात तरीही लस शेवटी पुण्यातच सापडणार आहे. ती लस पुणेकरांनी शोधली आहे. अन्यथा म्हणायचे मीच शोधली असं म्हणत सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.