आरएसएसशी संल्गन असणाऱ्या मंचाचा केंद्र सरकारला विरोध; मांडली ही भूमिका
राजकारण

आरएसएसशी संल्गन असणाऱ्या मंचाचा केंद्र सरकारला विरोध; मांडली ही भूमिका

नवी दिल्ली : मोदी सरकारने मांडलेल्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात अनेक राज्यांत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पंजाब- हरियाणा या दिल्ली लगतच्या राज्यांमध्ये याविरोधात तीव्र जनभावना आहेत. आता खुद्द संघाच्या मुशीत वाढलेल्या स्वदेशी जागरण मंचानेदेखील या विधेयकाच्या विरोधात भूमिका मांडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कृषी विधेयकांमध्ये सुधारणा करण्यास वाव आहे. सरकारने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीला धक्का बसणार नाही, याचं ठोस आश्वासन दिलं पाहिजे. त्यासाठी सरकार कृषी विधेयकांत बदल करावा अथवा नवीन कायदा पारित करावा, असं मत स्वदेशी जागरण मंचाच्या अश्विनी महाजन यांनी व्यक्त केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजधानीच्या मार्गांवर लाखो शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या स्वदेशी जागरण मंचाने देखील पाठिंबा दर्शवला आहे. शेतकरी आंदोलनात काहीसा बदल केला जाऊ शकतो, असं या मंचाचं म्हणणं आहे.