एमके स्टॅलिन तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान; ३३ मंत्र्यांचीही शपथ
राजकारण

एमके स्टॅलिन तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान; ३३ मंत्र्यांचीही शपथ

चेन्नई : तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकने मोठा विजय मिळवला. द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईच्या राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी स्टॅलिन यांना शपथ दिली. त्यांच्यासमवेत मंत्रिमंडळातील ३३ मंत्र्यांनीही शपथ घेतली. पक्षाचे नेते दुराई मुरुगन यांनी जलसंपदा मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एमके स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदासोबत राज्याचे गृहमंत्री म्हणूनदेखील शपथ घेतली. याशिवाय त्यांच्याकडे प्रशासकीय आणि पोलीस सेवा, विशेष योजना आणि सार्वजनिक बांधकाम संस्थाच्या कल्याणकारी योजनांची जबाबदारी देखील राहणार आहे. द्रमुकने एआयडीएमकेची सत्ता उलथून टाकली. तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात सहाव्या वेळी सत्तेत बसण्याची संधी द्रमुकला मिळाली आहे. डीएमके २००६–११, १९९६–२००१, १९८९–९१, १९७१–७६ आणि १९६७–७१ या काळात द्रमुक तामिळनाडूत सत्तेत होती.

विधानसभेच्या २३४ जागांपैकी द्रमुक आघाडीला १५९ जागा मिळाल्या, त्यापैकी १३३ द्रमुक, कॉंग्रेसला १८, व्हीसीकेला ४ तर सीपीएम, सीपीआयला २-२ जागा मिळाल्या. त्याचवेळी एआयडीएमके आघाडीला अवघ्या ७५ जागा मिळाल्या. त्यापैकी एआयडीएमकेला ६६, पीएमकेला ५ आणि भाजपला ४ जागा मिळाल्या आहेत.