काँग्रेसला मोठा धक्का; या अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

काँग्रेसला मोठा धक्का; या अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश

हैद्राबाद : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत 80-90चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री विजयाशांती यांनी हाती कमळ घेतल्याने दक्षिणेत भाजपची ताकद अजून वाढणार आहे. ग्रेटर हैद्राबाद महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी केल्यानंतर विजयाशांती यांनी घरवापसी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या नेत्या खुशबू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसंच सुपरस्टार रजनीकांतही राजकारणात सक्रीय होण्याच्या विचारात आहेत. विजयाशांती यांनी राजकीय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं ते भाजपच्याच साथीने. त्यानंतर त्या टीआरएस मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर 2014 साली विजयाशांती यांनी काँग्रेसचा हात धरला होता.

विजयाशांती यांचा जन्म 24 जून 1966 मध्ये तामिळनाडूतील चेन्नई येथे झाला होता. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी फिल्मी लाइनमध्ये पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. कल्लुकुल एरम हा त्यांचा पहिला सिनेमा. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये विजयाशांती यांनी चांगलं नाव कमावलं. लेडी अमिताभ अशी त्यांची ओळख बनली. तमिळ, तेलुगू आणि हिंदी या तिन्ही भाषेतील अनेक सुपरस्टार्ससोबत त्यांनी काम केलं.