राजकारण

भाजपाच्या गडाला सुरुंग लावत पुणे, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा

नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारनं विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची 73321 मतं मिळाली आहेत. तब्बल 48 हजार 824 मतांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी पहिल्या फेरीतच दणदणीत विजय मिळवला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला खिंडार पाडले आहे. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवं लागलं आहे. थोड्यावेळात अधिकृत त्यांच्या विजयाची घोषणा केली जाईल. लाड हे आज शरद पवार यांच्या भेटीला मोदीबागेत जाणार आहेत.

नागपूरमध्येही भाजपाला दणका
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपाला दणका दिला आहे. नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. पहिल्या पाचही फेऱ्यामध्ये भाजपाला मागे टाकत महाविकास आघाडीनं भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. तर भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

औरंगाबादच्या राष्ट्रवादी सतीश चव्हाणांनी मारली बाजी
महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. सतीश चव्हाण यांना तब्बल ११६६३८ मते मिळाली आहेत. भाजपाच्या शिरीष बोराळकर यांचा सतीश चव्हाणांनी पराभव केला. भाजपाच्या शिरीष बोराळकर यांना ५८७४३ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *