हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
राजकारण

हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : ”न्यायाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा नाही, कर्तव्य आहे. मोदी सरकार पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करुन शेतकऱ्यांना थांबवू शकत नाही. हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील, आमच्यासाठी ‘जय किसान’ होता आणि असेल” असे ट्वीट करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. तसेच, आमच्यासाठी जय किसान होता आणि राहील, अशा शब्दात राहुल गांधी यांनी करत मोदी सरकारचा निषेध केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ सुरू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांकडून जोरदार आंदोलने सुरु आहेत. यापूर्वी हरियाणातील शेतकऱ्यांनाही रोखण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र आता शेतकऱ्यांचे हे आंदोलन बरेच आक्रमक झाले आहेत. सिंधूच्या सीमेवर शेतकर्‍यांनी रात्र काढली अजूनही तिथेच आहेत. आता त्यांनी सिंधूच्या सीमेवरुन माघार घेणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनी प्रवाश्यांसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. सिंधू सीमा दोन्ही बाजूंनी बंद असून पर्यायी मार्ग निवडण्यास दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, शुक्रवारी देखील ‘सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून ‘काळे कायदे’ मागे घ्यावे.” असेही ट्वीट करत मोदी सरकार वर निशाणा साधला होता. तसेच, राहुल गांधींनी ट्वीट करून म्हटले की, “पंतप्रधानांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, जेव्हा जेव्हा अहंकार सत्याशी धडकतो, तेव्हा तो पराभूत होतो. “सत्याची लढाई लढणार्‍या शेतकऱ्यांना जगातील कोणतेही सरकार रोखू शकत नाही.” असेही त्यांनी म्हंटले आहे.