बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार! सीबीआय कार्यालयावर दगडफेक
राजकारण

बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार! सीबीआय कार्यालयावर दगडफेक

कोलकाता : सीबीआयने छापे टाकत तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि एका आमदाराला आज अटक केली. नरडा भ्रष्टाचार प्रकरणात मंत्री फिरहाद हकीम, सुब्रता मुखर्जी आणि आमदार मदन मित्रा यांना अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शने सुरु आहेत. त्यांनी दगडफेकही करण्यास सुरुवात केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याच प्रकरणामध्ये तृणमूल नेते आणि कोलकत्त्याचे माजी महापौर सोवन चटर्जी यांनाही अटक करण्यात आली आहे. राज्यपाल जगदीप धनकर यांच्या संमतीने ही अटक करण्यात आली. सीबीआयच्या कोलकत्त्याच्या कार्यालयाबाहेर तृणमूल कार्यकर्त्यांची निदर्शने सुरु आहे. आता या कार्यकर्त्यांनी सीबीआयच्या कार्यालयावर दगडफेक करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीच राज्यपाल जगदीप धनकर यांनी ट्विट करत अशी परिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे ममता यांनी राज्यातल्या शांतता व सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे असं आवाहनही केलं होतं.

कार्यकर्त्यांच्या निदर्शनामुळे कोलकत्त्यामधल्या सीबीआय कार्यालयाचं मुख्य प्रवेशद्वार आता बंद कऱण्यात आलं आहे. तर कार्यालयाच्या परिसरात फौज तैनात करण्यात आली आहे. यावरुन राज्यपाल धनकर यांनी पुन्हा एकदा ट्विट करत परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे.