भाजप आमदाराचा पक्षाला रामराम; कुकर्मांचं प्रायश्चित्त म्हणून केलं मुंडण
राजकारण

भाजप आमदाराचा पक्षाला रामराम; कुकर्मांचं प्रायश्चित्त म्हणून केलं मुंडण

नवी दिल्ली : दीर्घकाळचे भाजपचे नेते आणि त्रिपुराच्या सुरमा मतदारसंघाचे आमदार आशिष दास यांनी मंगळवारी राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कुकर्मांसाठी प्रायश्चित्त करत असल्याचा असा दावा केला आणि स्वतःचे मुंडण करवून घेतले. तसंच त्यांनी कोलकाताच्या प्रसिद्ध कालीघाट मंदिरात यज्ञ केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दास म्हणाले, ‘लोक राज्य सरकारच्या कामगिरीवर नाराज आहेत, म्हणून मी पक्ष सोडत आहे. भाजपने त्रिपुरामध्ये राजकीय अराजकता वाढवली आहे. ममता बॅनर्जी या पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत. आज मी भाजप सरकारच्या कुशासनाचं प्रायश्चित्त म्हणून माझे मुंडन केले आहे. मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझे पुढचे पाऊल वेळ ठरवेल.’ गेल्या दोन वर्षांपासून दास यांच्याकडे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांचे टीकाकार म्हणून पाहिले जाते. दास लवकरच तृणमूलमध्ये सामील होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, त्रिपुरा भाजपच्या सूत्रांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार पक्ष दास यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करेल. कोलकाता येथे माध्यमांशी बोलताना, उत्तर त्रिपुरामधील सुरमा विधानसभा मतदार संघाचे आमदार दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बहुतेक सरकारी मालमत्ता खाजगी पक्षांना विकल्याबद्दल टीका केली.