राजकारण

”दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुनच होणार”

मुंबई : ”दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुनच होणार. दसरा मेळावा शिवसेनेची परंपरा असून त्याचं सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. तसंच बऱ्याच वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. सरकारने आखलेल्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल. सध्या चर्चा सुरु असून एक दोन दिवसात निर्णय होईल,” असे सूचक माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी असल्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे साजरा करणार की यावेळी उद्धव ठाकरे ऑनलाइन संवाद साधतील, अशी चर्चा सुरु आहे. मात्र ”मेळावा ऑनलाइन होईल असं कोणी सांगितलं?,” असा प्रतिप्रश्न संजय राऊतांनी केला. तसेच, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. त्यामुळे त्यांचं भाषण हे व्यासपीठावरूनच होईल.” असेही त्यांनी सांगितले.

तसेच, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या गोष्टी ऑनलाइन होत आहेत. पण मी आजच वाचलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये 12 सभा घेणार आहेत. त्या कशाप्रकारे सभा घेतात त्याचा आम्ही अभ्यास करू. असेही ते म्हणाले. त्याचबरोबर कंगना रानौत गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, असे विचारले असता राऊत म्हणाले की, ”मला याबाबत कल्पना नाही. न्यायालयाच्या कारवाईचा आदर करायला हवा, असं सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य टाळले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत