Uttar Pradesh Election 2022 1st Phase Live : यूपीत पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरवात…
राजकारण

Uttar Pradesh Election 2022 1st Phase Live : यूपीत पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरवात…

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकी आज पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. वाचा उत्तर प्रदेशातील मतदानासह महत्त्वाच्या त्यासंबंधिच्या घडामोडींचे अपडेट…

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

– नियमानुसार मतदान केंद्रांवर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत उभे असतील त्यांनाच मतदानाची संधी दिली जाईल. ६ वाजेनंतर येणाऱ्या मतदारांना मतदान करता येणार नाही.

– सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. करोना संसर्गामुळे निवडणूक आयोगाने मतदानासाठी १ तासाचा कालावधी वाढवून दिला आहे. ५८ मतदारसंघात ६२३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

– बागपत, आग्रा, अलीगढ, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, गाझियाबाद, हापूर, शामली, मथुरा, मुझफ्फरनगर आणि मेरठ जिल्ह्यांमध्ये आज मतदान होत आहे

– निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २.२७ कोटी मतदार मतदान करतील

– मतदानाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांतील ५८ विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे.