योगी सरकार भाजप कार्यकर्त्यांविरोधीतील ५००० खटले घेणार मागे
राजकारण

योगी सरकार भाजप कार्यकर्त्यांविरोधीतील ५००० खटले घेणार मागे

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील योगी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मागील सरकारच्या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपने घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत ५००० हजारहून अधिक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्यांच टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीचं सरकार असतानाच आंदोलन आणि धरणं आंदोलन करणाऱ्यांविरोधात राजकीय हेतूने दाखल करण्यात आलेले तसेच खोटे आरोप करण्यात आलेले खटले मागे घेण्यात येणार असल्यांच सांगण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष, उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष राधा मोहन सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात बोलताना राज्याचे गृहमंत्री ब्रिजेश पाठक यांनी ही सामान्य प्रक्रिया आहे. हे खटले राजकीय हेतूने किंवा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेले. या सर्व खटल्यांचा अभ्यास करुन आम्ही असे खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही उत्तर प्रदेश सरकारने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात आणि नेत्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी न्याय विभागकडून पाठिंबा मागितला होता. निवडणुकींचा प्रचार सुरु होण्याआधी कार्यकर्त्यांना समाधानी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.