अकोल्यात ना महाविकास आघाडी ना भाजप; पोटनिवडणुकीत ‘या’ पक्षाचा पुन्हा वरचष्मा
राजकारण

अकोल्यात ना महाविकास आघाडी ना भाजप; पोटनिवडणुकीत ‘या’ पक्षाचा पुन्हा वरचष्मा

अकोला : अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत ना महाविकासआघाडी ना भाजपचा करिश्मा राहिला. अकोला जिल्हापरिषद पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा वरचष्मा राहिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अकोल्यातील एकूण १४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ६ जागांवर वंचितनं विजय मिळवला आहे त्याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसनं २ जागांवर मुसंडी मारली आहे. शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस यांना प्रत्येकी एक जागा जिंकता आली असून इतर ३ उमेदवार निवडून आले आहेत.

दरम्यान, वंचित पाठोपाठ बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षासाठी देखील निकाल साजरा करण्याची संधी आहे. कारण अकोला तालुक्याच्या कुटासा गटातून जिल्हा परिषदेवर बच्चू कडू यांच्या पक्षाच्या स्फूर्ती गावंडे विजयी झाल्या आहेत.