पदवीधर आमदारासाठी उद्या मतदान; ओळखपत्राव्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून धरणार ग्राह्य
राजकारण

पदवीधर आमदारासाठी उद्या मतदान; ओळखपत्राव्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून धरणार ग्राह्य

पुणे : पदवीधर मतदारसंघासाठी उद्या (ता. ०१) मतदान होणार आहे. यावेळी मतदान करताना मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करु शकणार नाहीत त्यांना ओळखपत्रांशिवाय आणखी वेगळ्या ९ ओळखपत्रांद्वारे मतदान केंद्रांवर आपली ओळक दाखवता येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोणकोणत्या ओळखपत्रांच्या सहाय्याने करता येणार मतदान?
1) आधार कार्ड
2) ड्रायव्हिंग लायसन्स
3) पॅनकार्ड
4) पारपत्र
5) केंद्र, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरित केलेले सेवा ओळखपत्र
6) आमदार, खासदार यांचे अधिकृत ओळखपत्र
7) संबंधित पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षक मतदारांना वितरित केलेले सेवा ओळखपत्र
8) विद्यापीठीद्वारे वितरित मूळ पदवी पदविका प्रमाणपत्र
9)सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणुक आयोगाने आदेशित केले आहे.

छायाचित्रांसह मतदार ओळखपत्रांन्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच छायाचित्रांसह मतदार ओळखपत्रांतील विसंगत छायाचित्रासह मतदाराची ओळख पटविणे शक्य नसल्यास मतदारांस उपरोक्त कागतपत्रांपैकी एक कागदपत्रं सादर करणे अनिवार्य राहिल अन्यथा मतदान करता येणार नाही.