राजकारण

हा देश हिंदूंचा आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही आणि हिंदुत्ववादी हे सत्ता पिपासू’

जयपूर : महागाईविरोधात आयोजित रॅलीमध्ये काँग्रेसने राजस्थानमध्ये आज शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि केंद्रातील भाजपवर हल्लाबोल केला. ही सभा महागाई, बेरोजगारी आणि पीडित जनतेसंबंधी आहे. देशात आज जी परिस्थिती आहे ती यापूर्वीच कधीच नव्हती. चार-पाच उद्योगपतींसाठी सरकार चालत आहे. देशातील सर्व संस्था एका संघटनेच्या हातात आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ओएसडी आहेत. आपले पंतप्रधान धनाढ्यांसाठी काम करत आहेत. नोटाबंदी, जीएसटी, काळे कृषी कायदे आणि करोना संकटात देशाची स्थिती आणखी बिघडली, असे राहुल गांधी म्हणाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशाच्या राजकारणात आज दोन शब्दांमध्ये टक्कर आहे. एक हिंदू आणि दुसरा हिंदुत्ववादी. दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत. महात्मा गांधी हिंदू आणि गोडसे हिंदुत्ववादी हा यातला फरक आहे. काहीही झालं तरी हिंदू सत्य समोर आणतो. आयुष्यभर त्यासाठी झटतो. पण शेवटी हिंदुत्ववाद्याने महात्मा गांधीजींच्या छातीत गोळ्या घातल्या. हिंदुत्ववादी सत्तेसाठी काम करत असोत. त्याला सत्याशी काहीही देणं घेणं नाही. कोणाची हत्या करेल, जाळे आणि कापेल. कारण त्याचा मार्ग सत्ता मिळवण्याचा आहे. हिंदू भीतीचा सामना करतो. तर हिंदुत्व भीपुढे झकते. यामुळे हा देश हिंदूंचा आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही, असा टोला राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसला लगावला.

हे टीव्ही चॅनेलवाले ५ मिनिटं ही सभा दाखवतील. हे टीव्हीवाले हिंदू आहेत. पण त्यांना हिंदुत्ववाद्यांची भीती आहे. पण आम्ही कुणाला घाबरत नाही. नरेंद्र मोदींच्या हिंदुत्ववादी मित्रांनी गेल्या ८ वर्षांत देश उद्ध्वस्त केला, असा आरोप राहुल गांधींनी केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published.