आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो; छगन भुजबळांचा भाजपावर निशाणा
राजकारण

आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो; छगन भुजबळांचा भाजपावर निशाणा

मुंबई : ”आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो,” अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात आज छगन भुजबळ यांचा जनता दरबार पार पडला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीका केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपा वर निशाना साधला आहे. यावेळी बोलताना भुजबळ यांनी भाजपाने सभागृहात केलेल्या आंदोलनांची आठवणही करून दिली. ”आंदोलनजीवी अशा पध्दतीने हिणवणं योग्य नाही. प्रत्येक लहान – सहान गोष्टींवर भाजप आजसुद्धा आंदोलन करत आहे त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

तसेच, ”आंदोलने ही जगभर होत आहेत. या देशाला ही आंदोलने नवीन नाहीत. भाजप सत्तेत नव्हती त्यावेळी रोज काही ना काही आंदोलन असायचं. कुठे बांगड्या घेऊन जा, कुठे रिकामे हंडे घेऊन जा, रस्त्यातच बस, वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने केली.असे भुजबळ यांनी म्हंटले आहे. तसेच, लोकशाहीमध्ये एखादा मुद्दा किंवा सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसेल तर पत्र पाठवायचं, निषेध व्यक्त करायचा, आंदोलन करायचे असते. मग याव्यतिरिक्त आणखी दुसरं काय करायचं असा सवालही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, ”आज कुणीतरी मला व्हॉटस्ॲपवर पाठवलं आहे की, मोदी गहिवरलेसुध्दा त्यामुळे नक्की हे खरे की ते खरे हे मोदींनाच विचारायला हवे खरे मोदी कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांवर टीका पण करतात. यूटर्न केल्याचा आरोपही करतात आणि युतीसुध्दा करतात, असा चिमटाही त्यांनी काढला.