पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेत नाही?
राजकारण

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेत नाही?

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केल्याचा उदोउदो करीत आहेत. पण त्यांनी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेतली नाही?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथे आपल्या निवासस्थानी ‘यशवंत भवन’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ”जुन्या काळात शिकारी लोक शिकारीनंतर असे ढोल बडवीत सर्व जंगलभर फिरत होते, तसाच हा प्रकार सुरु आहे. पंतप्रधानांनी लसीकरणाचे ढोल बडवत बसण्यापेक्षा कोविड लस स्वतः सिरींज भरून जनतेसमोर त्यामधील औषध टोचून घ्यावे. पंतप्रधानांनी असं केलं तरचं सामान्य जनतेला कोविड लसीबद्दल विश्वास निर्माण होईल. अन्यथा त्या बाटलीमध्ये लस किंवा नुसते पाणीच आहे, याबाबतचा संभ्रम दूर होईल.

तसेच, ‘जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी जाहीर केल्याप्रमाणे आपल्या पंतप्रधानांनी इतर देशाच्या पंतप्रधानांसारखं नियोजन करणं गरजेचं होतं. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसं न करता मध्यमांसमोर मोठेपणाचं प्रदर्शन मांडल.” असही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

यावेळी बोलताना त्यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरूनही टीकास्त्र सोडले. ”शहराच्या नामांतरणाच्या मुद्द्यावर पाच वर्ष महाविकास आघाडीची नाटकं सुरुच राहतील. या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांची तोंडं तीन दिशेला आहेत. मात्र, या मुद्द्यावरून सरकार पडण्याची कोणतीही शक्यता नाही.” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.