मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांचं खळबळजनक विधान
राजकारण

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांचं खळबळजनक विधान

चंदीगड : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन आपला राजीनामा सादर केला. यानंतर त्यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्याविषयी आता केलेलं विधान चर्चेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यात खटके उडताना दिसत आहे. अमरिंदर सिंग यांनी 18 सप्टेंबर रोजी सांगितले की, नवज्योतसिंग सिद्धू हे सक्षम नाहीत आणि पुढील मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाला आपण विरोध करु.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमरिंदर सिंह म्हणाले, नवज्योतसिंग सिद्धू एक असक्षम माणूस आहे, तो एक आपत्ती ठरणार आहे. पुढील मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी मी त्यांच्या नावाला विरोध करीन. त्याचा पाकिस्तानशी संबंध आहे. हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असेल, याविषयी मनीकन्ट्रोल या वृत्त संकेतस्थळाने माहिती दिली आहे.

ते पुढे म्हणाले, माझ्या देशासाठी, मी त्यांच्या (नवज्योत सिंग सिद्धू) पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला विरोध करणार आहे. ही राष्ट्रीय सुरक्षेची बाब आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्यांचे मित्र आहेत. सिद्धू यांचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी संबंध आहेत. अमरिंदर यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर काही तासांतच हे विधान केलं आहे.