राजकारण

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन मुदतीपूर्वीच संपणार?

नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन मुदतीपूर्वीच संपविण्याची विनंती सर्व पक्षांच्या सदस्यांनी केली आहे. याबाबत अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला घेणार आहेत. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसातच हे अधिवेशन संपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत सर्वच पक्षांच्या खासदारांचे कोरोनाची परिस्थिती पाहता अधिवेशन लवकर उरकण्यावर एकमत झालं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संसदेच्या नियोजनानुसार, पावसाळी अधिवेशनाचा कालावधी १ ऑक्टोबरपर्यंत निश्चित केला होता. संसदेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत काटेकोरपणे कामकाज चालवले जात आहे. १४ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या संसदेच्या अधिवेशाना दरम्यान आतापर्यंत एकूण १६२ व्यक्ती कोरोनाबाधित झाले आहेत. यात ३० खासदारांव्यतिरिक्त संसदेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत लोकसभेतील दोन आणइ राज्यसभेच्या एक खासदाराचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दोन कॅबिनेट मंत्रीही कोरोनाने संक्रमित झाले आहेत.

दरम्यान, या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारच्या ११ वटहुकूम संसदेत संमत होणे अत्यावश्यक आहे. कोरोना काळात काढलेल्या 11 अध्यादेशांना संसदेत मंजूर करुन घेण्यावर सरकारची प्राथमिकता आहे. यामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित तीन महत्वाचे अध्यादेश आहेत, ज्याविरोधात अनेक राज्यांमध्ये आंदोलने सुरु आहेत. एकूण 11 अध्यादेशांपैकी 7 लोकसभा आणि 4 राज्यसभेमध्ये मंजुर झाले आहेत.

त्याचबरोबर कामगार आणि मजुरांशी संबंधीत तीन आहेत. आज लोकसभेत सादर केल्या गेलेली तीन विधेयके मंगळवारी पारीत होऊ शकतात. त्यानंतर ती राज्यसभेत पारीत करण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त जम्मू कश्मीर आधीकरिक भाषा बिल आणि परदेश देणगी ( नियामक ) संशोधन बिल देखील सरकार पारित करु इच्छिते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत