मुंबई : मुंबईने लखनौच्या संघावर विजय साकारला आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट घडली. मुंबईचा संघ गेल्या १८ वर्षांपासून आयपीएल खेळत आहे, पण गेल्या २८ वर्षांचा इतिहास मुंबई इंडियन्सच्या संघाने कायम राखला आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा सामना चांगलाच रंगतदार झाला. पण मुंबईच्या संघाने यावेळी बाजी मारली. सूर्यकुमार यादव आणि रायन रिक्लेटन यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली. त्यामुळे घरच्या मैदानात मुंबईच्या संघाला दोनशे धावांचा पल्ला यावेळी ओलांडता आला. मुंबईच्या संघाने या सामन्यात २१५ धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे मुंबईचा संघ सामना सहज जिंकेल, असे वाटत होते. पण त्यानंतर मात्र लखनौच्या खेळाडूंनी तुफानी फटकेबाजी केली. पण त्यावेळी जसप्रीत बुमराह आणि विल जॅक्स संघाच्या मदतीला धावून आले. बुमराहने चार आणि जॅक्सने एकाच षटकात दोन विकेट्स काढल्या, त्यामुळेच मुंबईच्या संघाला विजय साकारता आला. पण या विजयानंतर मुंबईच्या संघाने १८ वर्षापासूनचा एक खास विक्रम कायम राखला आहे.
मुंबईच्या संघातील गोलंदाजांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कारण पाटा पीचवर त्यांनी दमदार गोलंदाजी केली. पण ही गोष्ट फक्त या सामन्यापुरताच मर्यादीत नाही, तर गेल्या १८ वर्षांपासूनची ही परंपरा कायम आहे. कारण गेल्या १८ वर्षांत मुंबई इंडियन्सने जेव्हा जेव्हा २०० धावांचा पल्ला गाठला आहे, तेव्हा तेव्हा त्यांनी आतापर्यंत एकदाही सामना गमावलेला नाही. जेव्हा २०० धावा होतात तेव्हा पीच फलंदाजीसाठी पोषक असते. पण त्याचवेळी मुंबईच्या गोलंदाजांनी आतापर्यंत अचूक आणि भेदक गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच आतापर्यंत जेव्हा मुंबईच्या संघाने २०० पेक्षा जास्त धावांचे आव्हान प्रतिस्पर्धी संघाला दिले, त्यावेळी मुंबईच्या गोलंदाजांनी आपला किल्ला शाबूत ठेवला आहे. त्यामुळेच मुंबईच्या संघाचा गेल्या १८ वर्षांतील ही विजयी परंपरा राहीली आहे.
मुंबईच्या संघाने गेल्या १८ वर्षांची आपली परंपरा कायम ठेवली आहे. मुंबईच्या संघाने यावेळी १८ वर्षांपासून कोणता विक्रम अबाधित ठेवला आहे, ते आता समोर आले आहे.