तिसऱ्या कसोटीत भारताचा दारुण पराभव; चौथ्या दिवशी गडगडला डाव
क्रीडा

तिसऱ्या कसोटीत भारताचा दारुण पराभव; चौथ्या दिवशी गडगडला डाव

लीड्स : तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला आहे. इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला. काल दिवसअखेर शतकाच्या उंबरठ्यावर असलेला पुजारा आणि अर्धशतकवीर विराट कोहली आज लवकर माघारी परतले. त्यानंतर भारताचा दुसरा डाव सकाळच्या सत्रात भारताचा दुसरा डाव २७८ धावांवर आटोपला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने ६५ धावांत ५ बळी घेत भारताच्या डावाला खिंडार पाडले. विशेष म्हणजे मागील काही काळापासून फॉर्म हरवलेल्या चेतेश्वर पुजाराच्या शतकाकडे सर्वांच्या नजरा होत्या. पण आज खेळ सुरू झाल्यानंतर रॉबिन्सनने पुजाराला पायचित पकडले. पुजारा १५ चौकारांसह ९१ धावांची खेळी करून माघारी परतला. या विजयामुळे इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

चौथ्या दिवशी चेतेश्वर पुजाराला एकाही धावेची भर घातला आली नाही. ओली रॉबिन्सनने पुजाराला पायचित पकडले. पुजारा १५ चौकारांसह ९१ धावांची खेळी केली. पुजारानंतर अजिंक्य रहाणे विराटची साथ द्यायला मैदानात आला. विराटने अर्धशतकी टप्पा ओलांडल्यानंतर तंबूचा मार्ग धरला. रॉबिन्सनने त्याला वैयक्तिक ५५ धावांवर बाद केले. त्याच्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेही (१०) अँडरसनचा बळी ठरला. त्यानंतर आलेले ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी आणि इशांत शर्माही चमत्कार दाखवू शकले नाहीत. इशांत शर्मा रॉबिन्सनचा पाचवा बळी ठरला.