क्रीडा

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर मुंबईच्या नावावर नकोसा विक्रम

मुंबई : आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईचा चेन्नईने पराभव केला आहे. या पराभवानंतर मात्र, मुंबई इंडियन्सच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. या हंगामातील पहिल्याच सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघानं रोहितच्या मुंबई इंडियन्सला पाच विकेटने पराभवाचा धक्का दिला. आयपीएलमधील आपल्या पहिल्याच सामन्यात पराभूत होण्याची मुंबईची ही सलग आठवी वेळ आहे. २०१२ साली झालेल्या आयपीएलमधील आपल्या पहिल्या सामन्यात मुंबईनं विजय मिळवला होता. त्यानंतर आतापर्यंत मुंबईला आपल्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवता आला नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आयपीएलमध्ये सलग आठ वेळा आपल्या सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याचा नकोसा विक्रम मुंबईच्या संघानं आपल्या नावावर नोंदवला आहे. आयपीएलमधील आपल्या पहिल्या सामन्यात मुंबईला आतापर्यंत फक्त चार वेळा विजय मिळवता आला आहे तर ९ वेळा पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. ४ वेळा चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबईच्या संघाची आयपीएलमधील सुरुवात खराब असल्याचा आतापर्यंतचा विक्रम आहे. यंदाही पहिल्याच सामन्यात मुंबईला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

आयपीएलच्या पहिल्या सामन्यातील मुंबईची कामगिरी

२००८ : आरसीबीचा मुंबईवर पाच विकेटने विजय
२००९ : मुंबईचा चेन्नईवर १९ धावांनी विजय
२०१० : मुंबईचा राजस्थानवर ४ धावांनी विजय
२०११ : मुंबईचा दिल्लीवर ८ विकेटने विजय
२०१२ : मुंबईचा चेन्नईवर ८ विकेटने विजय
२०१३ : आरसीबीकडून मुंबई २ धावांनी पराभूत
२०१४ : मुंबईचा कोलकाता संघाकडून ४१ धावांनी धुव्वा
२०१५ : कोलकाता संघाने ७ विकेट्सने मुंबईवर विजय मिळवला.
२०१६ : मुंबईचा ९ विकेटने पुण्याने पराभव केला.
२०१७ : पुणे संघाने सात बळी राखून मुंबईवर विजय मिळवला.
२०१८ : चेन्नईने मुंबईचा केवळ १ विकेट राखूीन पराभव केला.
२०१९ : दिल्लीने ३७ धावांनी मुंबईवर विजय मिळवला.
२०२० : चेन्नई संघानं ५ विकेट राखून मुंबईचा पराभव केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत